In car accident the youth dies on the spot | भरधाव कारने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
भरधाव कारने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्ता क्रॉस करताना 21 वर्षीय तरुणाला भरधाव वेगातील अनोळखी कारने चिरडल्याची घटना घडली आहे. वसईमध्ये राहणारा महेंद्र कुमार रामेश्वर यादव (21) असे त्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महेंद्र रस्ता क्रॉस करत असताना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील होंडा सिटी कारने त्याला चिरडले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यानंतर अनोळखी कार चालक कार घेऊन पळाला आहे. वालीव पोलिसांनी फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: In car accident the youth dies on the spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.