अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या भरधाव वेगामुळे कारचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 21:05 IST2018-07-21T21:04:12+5:302018-07-21T21:05:19+5:30
ओशिवरा पोलीस ठाण्यात रॅश ड्राइव्हिंगप्रकरणी गुन्हा दाखल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या भरधाव वेगामुळे कारचा अपघात
मुंबई - ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोरच्या रोडवर म्हणजेच न्यु लिंक रोडवर बालिका वधू आणि दिल ले दिल तक या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारचा (एमएच ०२, इआर १२१२) अपघात झाला आहे. अपघातात तीन अन्य चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून सिद्धार्थची बीएमडब्ल्यू कार अपघातात डिव्हाडरवर चढली. याप्रकरणी बेजबाबदारपणे भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ शुक्लाविरोधात भा. दं. वि. कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासालवाड यांनी दिली.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाच्या कारने भरधाव वेगाने येऊन तीन गाड्यांचे नुकसान करत डिव्हाडरवर चढली. ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या श्रीजी हॉटेलसमोरच हा अपघात झाला. या अपघातादरम्यान श्रीजी जंक्शन ते मेघा लिंक रोडवरील वाहतूक थोड्यावेळासाठी बंद करण्यात आली होती. या अपघातात सिद्धार्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले होते. हि ड्रंक अँड ड्राईव्हची केस नसून रॅश ड्राईव्हिंगची केस असल्याचे पासालवड यांनी सांगितले.