शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रप्रदेशातून गांजाची दिल्लीला केल्या जाणाऱ्या तस्करीचा कट उधळला; बेलतरोडी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 15:39 IST

Drug smuggling : पोलिसांनी आरोपीकडून १२०० रुपये आणि मोबाइलही जप्त केला. 

ठळक मुद्देशिवशंकर यलया इसमपल्ली (वय २७) असे पोलिसांनी अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे. तो हैदराबादचा रहिवासी आहे.

नागपूर : आंध्रप्रदेशातून गांजाची मोठी खेप घेऊन निघालेल्या एका तस्कराला बेलतरोडी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९२ किलो गांजा तसेच कार असा एकूण १८ लाख, ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवशंकर यलया इसमपल्ली (वय २७) असे पोलिसांनीअटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे. तो हैदराबादचा रहिवासी आहे.

बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री महामार्गावर गस्त करीत असताना त्यांना डीएल ४सी / एडीड ३६६५ क्रमांकाची शेवरलेट कार येताना दिसली. कार चालकाचे पोलिसांवर लक्ष जाताच तो विचलित झाला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कारचालक इसमपल्ली याला बाजुला थांबवून त्याची चौकशी केली. तो असंबद्ध उत्तर देत असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी  कारची कसून तपासणी केली. कारच्या डिकीमधे चोरकप्पा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो उघडून बघितला असता आतमध्ये प्लास्टिकच्या चार पोत्यांमध्ये ९१ किलो, ५५६ ग्राम गांजा आढळले. त्यामुळे पोलिसांनी कारचालक आरोपी इसमपल्ली याला बेलतरोडी ठाण्यात आणले. तेथे त्याची चौकशी केली असता हैदराबाद मधून गांजाची ही खेप दिल्लीला नेत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १३ लाख, ७३ हजार, ३४० रुपये असून कारची किंमत पाच लाख रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून १२०० रुपये आणि मोबाइलही जप्त केला. आंध्रप्रदेशला जाणार पोलीस पथकअटक केली केलेल्या आरोपीने हा गांजा तसेच कार कुणाची, त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी बेलतरोडीचे पोलीस पथक हैदराबाद आणि दिल्लीला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, हवलदार श्रीराम देवढे, रणधीर दीक्षित, अविनाश ठाकरे तसेच गोपाल देशमुख, मिलिंद पटले, प्रवीण जांभूळकर, मनोज शाहू, राकेश रुद्रकार, कुणाल लांडगे आणि नितीन बावणे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थPoliceपोलिसnagpurनागपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशdelhiदिल्ली