पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:06 IST2025-12-24T08:49:11+5:302025-12-24T09:06:37+5:30
लग्न समारंभात नातेवाईक बनून घुसणारी एका धूर्त महिलेला बंगलुरु पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॅरेज हॉलमधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलाकडून ३२ लाख रुपयांच्या किमतीचे २६२ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
लग्नामध्ये जाऊन नातेवाईक असल्याचे भासवून एका महिलेने लाखो रुपयांचे सोने लंपास करणाऱ्या एका महिलेला बंगळुरु पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेने नातेवाईक असल्याचे भासवून लग्न मंडपात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. तिच्या अटकेसह, पोलिसांनी अंदाजे ३२ लाख किमतीचे २६२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील मंजुनाथ नगर येथील एका महिलेने बसवनगुडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ती आणि तिची आई एका नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एका लग्न मंडपात गेल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान, दोघींनी त्यांच्या बॅगा, त्यामध्ये सोन्याची साखळी होती, एका ठेवल्या होत्या.
समारंभानंतर ती महिला घरी परतली आणि तिची बॅग तपासली तेव्हा तिला अंदाजे ३ लाख किमतीची सोन्याची साखळी गायब असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याच्या आधारे बसवनगुडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विविध दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
एका गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी १ डिसेंबर रोजी उदयनगर, के.आर. पुरम परिसरातून एका महिलेला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपी महिलेने बसवनगुडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या आणि इतर दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
ती नातेवाईक असल्याचे भासवून इतर जिल्ह्यांमध्ये लग्न समारंभांना उपस्थित राहायची आणि जेव्हा तिला वाटेल तेव्हा सोन्याचे दागिने चोरायची, अशी कबुली त्या महिलेने दिली. तिने चोरीचे दागिने तिच्या घरी ठेवले होते. यानंतर तिने तिच्या पतीसोबत मिळून सोनं बँकेतून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले होते.