घरी बोलावले अन् कॉफीतून गुंगीचे औषध देत बलात्कार केला; पुण्यातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 22:26 IST2022-12-21T22:24:48+5:302022-12-21T22:26:26+5:30
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला केटरिंगचा व्यवसाय करते.

घरी बोलावले अन् कॉफीतून गुंगीचे औषध देत बलात्कार केला; पुण्यातील घटनेने खळबळ
- किरण शिंदे
हॉटेल व्यवसायाची चर्चा करण्याच्या बहाण्याने एका 36 वर्षीय महिलेला घरी बोलावले. घरी आल्यानंतर कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाचवी बलात्कार केलाय. पुण्याच्या खराडी परिसरात 3 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला केटरिंगचा व्यवसाय करते. तिची आणि आरोपीची ओळख कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. कोरोना काळात व्यवसाय बंद पडल्याने आरोपी कामाच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राने फिर्यादी महिलेचा मोबाईल क्रमांक त्याला दिला होता. यातून दोघांची ओळख झाली होती. एकत्र हॉटेल व्यवसाय करायचा असेे दोघांचे ठरले होते.
दरम्यान तीन ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने या महिलेला हॉटेल व्यवसायाची चर्चा करूयात असे सांगून घरी बोलावले. घरी आल्यानंतर कॉफीमध्ये गुंगीचे औषध साधून फिर्यादी यांच्यावर पाचवी बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही महिला तिथून निघून आली. त्यानंतर तिने अखेर चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.