OLX वर वस्तू खरेदी करताय, सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:28 IST2018-10-30T20:15:29+5:302018-10-30T20:28:19+5:30
या टोळीद्वारे रायगड जिल्ह्यात १८ तर ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण २० घरफोड्या आणि चोऱ्या करण्यात आल्या होत्या. यात रायगड जिल्ह्यातील माणगावमधील ८ रसायनीमधील १, दादर सागरीमधील २, कोलाडमधील २, पेण मधील १ तर म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्ह्यांचा समावेश होता.

OLX वर वस्तू खरेदी करताय, सावधान!
मुंबई - चोरी केलेला माल OLX या वेबसाईटवर विकणाऱ्या गॅंगच्या रायगड पोलिसांनी आवळल्या आहेत. रायगड पोलिसांच्या या कारवाईमुळे ठाणे, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २० घरफोडया आणि चोऱ्यांची गुन्हे उघड झाले आहेत. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३१० ग्रँम सोन्याचे दागिने, ३६ मोबाइल्स, ४ लॅपटॉप्स, ३ एलसीडी टिव्ही, १ कार आणि १ मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीद्वारे रायगड जिल्ह्यात १८ तर ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण २० घरफोड्या आणि चोऱ्या करण्यात आल्या होत्या. यात रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील ८ रसायनीमधील १, दादर सागरीमधील २, कोलाडमधील २, पेणमधील १ तर म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्ह्यांचा समावेश होता. सुरवातीला टोळीचा म्होरक्या मौअजम अवी बुलेन शेख स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने अटक केली. त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर ईश्वर रमेश अडसुळे याला शिरढोण कोल्हापुरातून, सनी जैसवालला सावर्डे चिपळूण येथून, प्रविण कांदेला नालासोपारा पश्चिम येथून, राकेश चांदिवडेला कोपरखैराणे, नवी मुंबई येथून तर शरद घावेला वसई येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.