मॉडेलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी व्यावसायिकाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 00:28 IST2019-04-23T00:27:44+5:302019-04-23T00:28:32+5:30

अमित अग्रवाल (35) असं या आरोपीचं नाव आहे.

The businessman has been accused of sexually assaulting the model | मॉडेलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी व्यावसायिकाला बेड्या

मॉडेलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी व्यावसायिकाला बेड्या

मुंबई - 28 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अंधेरीतील एका व्यावसायिकास ओशिवरा पोलिसांनीअटक केली आहे. अमित अग्रवाल (35) असं या आरोपीचं नाव आहे.

आरोपीला 14 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून अमितने ब्लॅकमेलिंग करत आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मॉडेलने तक्रारीत नमूद केला आहे. मूळची उत्तर प्रदेशची असलेली ही पीडित मॉडेल एका कार्यक्रमासाठी मुंबईत आली होती. तिथे तिची ओळख अमितबरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर लिव्ह इनमध्ये झाले. मात्र, 2017 साली अमितच्या मोबाईलमध्ये तिला त्या दोघांचा एमएमएस दिसला. जो बघून तिला चक्कर आली. त्यानंतर काही दिवसांतच अमितचे तिच्याशी भांडणं होऊ लागली. नंतर अमित तिला मारहाण करू लागला. तसेच त्याच्याजवळील एमएमएस घरातल्यांना दाखवीन अशी धमकी देऊ लागला. यामुळे रोजच्या या त्रासाला कंटाळल्याने पीडित मॉडेल आपल्या घरी उत्तर प्रदेशमध्ये निघून गेली. तिथे तिचा एका वकीलाबरोबर साखरपुडाही झाला. त्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली. दरम्यान पुन्हा अमितने धमक्या देत तिच्यावर लैंगिक शोषण केले.

 

Web Title: The businessman has been accused of sexually assaulting the model