व्यावसायिक महिलेचा दोनदा विनयभंग करणाऱ्या भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 23:06 IST2019-01-03T23:05:14+5:302019-01-03T23:06:11+5:30
25 वर्षाच्या व्यावसायिक महिलेचा दोन वेळा विनयभंग करणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

व्यावसायिक महिलेचा दोनदा विनयभंग करणाऱ्या भामट्याला अटक
मुंबई - बोरिवली मार्केट परिसरात 25 वर्षाच्या व्यावसायिक महिलेचा दोनदा विनयभंग करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित महिला बोरिवलीत राहणारी आहे. ती काल सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ भाजी खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेली होती. त्यावेळी किशन जयस्वाल याने तिला स्पर्श केला. मात्र, चुकून हात लागला असावा, असे समजून तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने पुन्हा स्पर्श केल्याने महिलेने त्याला हटकले. तरीही तो थांबला नाही. शेवटी तिने भररस्त्यात आरडाओरडा केला. पादचाऱ्यांनी किशनला अडवले. महिलेने दूरध्वनी करून पतीला बोलावले आणि किशनविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.