हायप्रोफाईल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; ५ विदेशी तरुणी स्पाच्या नावाखाली करत होत्या वेश्याव्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 16:34 IST2019-09-19T16:31:52+5:302019-09-19T16:34:33+5:30

स्पाचा मालक गोपाळ रमेश मिश्रा (२३) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

Bursted highprofile sex racket; 5 Foreign women doing prostitution under the name of spa | हायप्रोफाईल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; ५ विदेशी तरुणी स्पाच्या नावाखाली करत होत्या वेश्याव्यवसाय

हायप्रोफाईल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; ५ विदेशी तरुणी स्पाच्या नावाखाली करत होत्या वेश्याव्यवसाय

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून स्पावर छापा टाकला ताब्यात घेतलेल्या स्पा मालकाला कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे - कोरेगाव पार्क येथील जीवांका स्पा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून स्पावर छापा टाकला आणि स्पाचा मालक गोपाळ रमेश मिश्रा (२३) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

गोपाळ हा येरवडा येथील राम नगर परिसरात राहणारा असून तो अशोक मॉलमध्ये जीवांका नावाचा स्पा सेंटर चालवत होता. या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. ५ परदेशी तरुणी या सेक्स रॅकेटमध्ये सामील होत्या असून त्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या होत्या. या ५ परदेशी तरुणींना सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या स्पा मालकाला कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोरेगाव पार्क पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असताना त्यांना सहकार नगर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आणि एका मुलीची सुटका केली. 

Web Title: Bursted highprofile sex racket; 5 Foreign women doing prostitution under the name of spa