गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 16:16 IST2021-10-30T16:14:45+5:302021-10-30T16:16:12+5:30
भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला.

गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला.
पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगर इमारत क्र . ६ मध्ये राहणारे दत्ता मुळजे त्यांच्या आई मंगलबाई यांच्या अकस्मात निधनामुळे अंत्यविधीसाठी कुटुंबासह कर्नाटक येथील मूळ गावी गेले होते. दत्ता यांचा लहान भाऊ श्रीकांत हा २७ ऑक्टोबर रोजी भाईंदर येथे आला असता दत्ता यांच्या घराचे लॉक कापलेले व आतील कडी तोडलेली असल्याचे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे आढळून आले .
घरातील ३ लाख किमतीचे ६ तोळे वजनाचे मंगळसुत्र,अंगठी, लॉकेट, कानातले झुमके असे दागिने व दिड ल;लाख रुपये रोख आणि ५ हजाराचा कॅमेरा असा ४ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्या प्रकरणी दत्ता यांनी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गावी वा बाहेगावी जाताना नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व सूचनांचे पालन करावे तसेच शेजाऱ्यांनी देखील आपल्या आजूबाजूच्या बंद घरांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे .