भिवंडीत घरफोडी करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

By नितीन पंडित | Updated: May 8, 2024 20:48 IST2024-05-08T20:48:43+5:302024-05-08T20:48:53+5:30

नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यातल्या दोन गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Burglar arrested in Bhiwandi; Crime Branch action | भिवंडीत घरफोडी करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडीत घरफोडी करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी: शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच भिवंडी गुन्हे शाखेने एका चोरट्यास अटक करत त्याच्याकडून नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यातल्या दोन गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
         
आसिफ सत्तार शेख वय २५ वर्ष रा. शेलार मिटपाडा असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असू ४ लाख ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आला आहे. तर त्याचे दोन साथीदार सुफीयान अमन खान वय २१ वर्ष रा. मानपाडा कल्याण व तसलीम अमन खान वय २९ वर्ष हे दोघे फरार झाले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
        
सदरची कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, देवानंद पाटील,शशिकांत यादव, वामन भोईर, अमोल देसाई, महिला पोलीस हवालदार श्रेया खताळ माया डोंगरे पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई उमेश ठाकूर, अमोल इंगळे, भावेश घरत, सचिन सोनवणे, चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Burglar arrested in Bhiwandi; Crime Branch action