'बुलेट राणी'ला स्टंट महागात पडला, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:41 PM2022-05-20T20:41:35+5:302022-05-20T20:42:11+5:30

Stunt Case : शिवानी डबास सतत तिचे स्टंटबाज व्हिडिओ बनवते आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड करते, मात्र यावेळी गाझियाबाद पोलिसांनी तिच्यावर कडक कारवाई केली आहे.

'Bullet Queen' done stunt, police taught a good lesson; Watch the video | 'बुलेट राणी'ला स्टंट महागात पडला, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हिडिओ

'बुलेट राणी'ला स्टंट महागात पडला, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हिडिओ

googlenewsNext

गाझियाबाद : आजच्या काळात सोशल मीडियाने संपूर्ण जगावर आपली छाप निर्माण केली आहे. जगाच्या कोणत्याही भागातून तुम्ही काहीही शेअर केले तर काही मिनिटांतच व्हायरल होते.  गाझियाबादच्या रस्त्यावर स्टंट करतानाचा शिवानी डबासचा असाच एक व्हिडिओ सध्या शोधलं मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शिवानीला बुलेट राणी असेही म्हटले जाते. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिवानी धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. कधी शिवानी हात सोडून बुलेट चालवत असते तर कधी चालत्या बुलेटवर स्वतःवर पाणी ओतते. शिवानी डबास सतत तिचे स्टंटबाज व्हिडिओ बनवते आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड करते, मात्र यावेळी गाझियाबाद पोलिसांनी तिच्यावर कडक कारवाई केली आहे.

पोलिसांनी तिला तसे न करण्याचा इशारा दिला असून ते केवळ चलानच नाही तर गुन्हाही दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक, असे धोकादायक स्टंट व्हिडिओ बनवण्यामागचे कारण म्हणजे एक प्रकारे सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे. लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालतात. स्टंटबाजी करणाऱ्यांना चलानाबाबत भीतीही नसते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टपणे असे व्हिडिओ बनवू नयेत किंवा अपलोड करू नयेत असे सांगितले आहे. इशाऱ्यासोबतच पोलिसांनी शिवानीच्या कुटुंबीयांना सूचनाही दिल्या आहेत. असे स्टंट जीवघेणे ठरू शकतात, त्यामुळे स्वतःसह इतरांच्या जीवाचीही काळजी घेतली पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 'Bullet Queen' done stunt, police taught a good lesson; Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.