शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

बिल्डरच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून दाट वस्तीतच दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:44 PM

बुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात.

ठळक मुद्देबुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात.

उमरेड : पालिकेचे माजी नगरसेवक तथा बिल्डर्स अरूण गिरडकर यांच्या पत्नीवर अज्ञात चोरट्यांनी बंदुक ताणत दरोडा टाकला. आज गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या थरार नाट्यात बंदुकीच्या धाकावर दोन दरोडेखोरांनी सोन्याचे दागिणे घेत पोबारा केला. विमल अरूण गिरडकर असे महिलेचे नाव असून या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे अरूण गिरडकर हे दुपारी ४ वाजताच्या सुुमारास बाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि वॉक करण्यासाठी गेले. अशातच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दोन दरोडे त्यांच्या राहत्या घरात शिरले. दोघांपैकी एका दरोडेखोराने विमल गिरडकर यांच्यावर बंदुक ताणली. दुसºयाने त्यांचे हात रूमालाने बांधले. अशातच तुम्हाला जे हवे आहे ते घेवून जा पण मला मारू नका अशा शब्दात विमल यांनी  दरोडेखोरांना विनवणी केली. दरोडेखोरांनी गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचा गोप, दोन तोळ्याचे मंगळसुत्र आणि बेनटेक्सच्या बांगड्या आणि नगदी अंदाजे दोन हजार रूपये असा एकूण दोन लाख रूपयांचा मुद्देमाल हिसकावत पोबारा केला. विमल गिरडकर यांनी लागलीच शेजारच्यांना घटनाक्रम सांगीतला. पती अरूण गिरडकर यांच्याही कानावर घटनाक्रम सांगीतला. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या नेतृत्त्वात पोलीस कर्मचारी तातडीने पोहोचले. दोन्ही दरोडेखोरांचा संवाद मराठीत होता. अंदाजे ३५ वयोगटातील असलेल्या या चोरट्यांनी डोक्यावर टोपी आणि पांढरा रूमाल बांधून होते, अशीही माहिती यावेळी विमल गिरडकर यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी