'गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा', विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:19 IST2022-07-25T15:19:39+5:302022-07-25T15:19:54+5:30
मृताच्या इन्स्टाग्राम आयडीवरुन मित्र आणि कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅपवर एक स्क्रीनशॉट शेअर झाला आहे.

'गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा', विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ
भोपाळ :मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रेल्वे ट्रॅकवर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून मृताची स्कूटी आणि मोबाईलही मिळाला. दरम्यान, मृताच्या इन्स्टाग्राम आयडीवरुन त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर एक स्क्रीनशॉट शेअर झाला आहे. 'गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा' असे त्यावर लिहिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिवनी माळवा येथील रहिवासी उमाशंकर राठोड यांचा मुलगा निशंक राठोड (20) हा भोपाळ येथील ओरिएंटल कॉलेजमध्ये बीटेक पाचव्या सेमिस्टरचा विद्यार्थी होता. त्याचा मृतदेह रविवारी रात्री भोपाळ-नर्मदापुरम रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची स्कूटी आणि मोबाईल मृताच्या जवळ ठेवण्यात आला होता.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना या प्रकरणाची माहिती दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आता मृत्यूचे कारण कळण्यासाठी पीएम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, कुटुंबीय आणि मित्रांचे म्हणणे आहे की रात्री निशंकच्या इन्स्टाग्राम आयडीचा स्क्रीनशॉट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आल्याची माहिती आहे. पोलिस दुसऱ्या अँगलनेही या प्रकरणाचा तपास करत आहेत.