एकतर्फी प्रेमातून सनकी युवकानं केली महिलेची क्रूर हत्या; अनेक तास मृतदेहाला कवटाळून बसला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:30 AM2021-10-25T09:30:39+5:302021-10-25T09:33:30+5:30

घटनेच्या दिवशी महिला मनरेगात काम करत होती. तेव्हा अचानक आरोपी गणेश त्याठिकाणी आला आणि त्याने महिलेसमोर प्रेमाची कबुली दिली.

The brutal murder of a woman by youth out of one-sided love; hugged the corpse for many hours | एकतर्फी प्रेमातून सनकी युवकानं केली महिलेची क्रूर हत्या; अनेक तास मृतदेहाला कवटाळून बसला, मग...

एकतर्फी प्रेमातून सनकी युवकानं केली महिलेची क्रूर हत्या; अनेक तास मृतदेहाला कवटाळून बसला, मग...

Next
ठळक मुद्देस्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. तेव्हा तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचलेगावातील गणेश थानाराम मीणा हा मनरेगात काम करणाऱ्या एका महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

जालोर – राजस्थानमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या महिलेने माथेफिरू युवकानं कुऱ्हाडीनं हल्ला केला. इतकचं नाही तर जोपर्यंत या महिलेचा जीव जात नाही तोवर कुऱ्हाडीचा प्रहार सुरूच ठेवला. त्यानंतर माथेफिरू युवक महिलेच्या मृतदेहाला मिठीत घेत अनेक तास जागेवरच बसून राहिला. या घटनेचे परिसरातील सगळ्यांनाच धक्का बसला.

स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. तेव्हा तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हाही युवक मृतदेहाला मिठीत घेऊन बसला होता. पोलिसांनी जबरदस्तीने आरोपी आणि मृतदेहाला वेगळं केले. आरोपी युवकाला अटक केली तर महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. राजस्थानच्या जालोर येथील अहोर परिसरातील ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गावातील गणेश थानाराम मीणा हा मनरेगात काम करणाऱ्या एका महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

घटनेच्या दिवशी महिला मनरेगात काम करत होती. तेव्हा अचानक आरोपी गणेश त्याठिकाणी आला आणि त्याने महिलेसमोर प्रेमाची कबुली दिली. महिलेने त्याला नकार देताच आरोपीचा संताप अनावर झाला. त्याने कुऱ्हाडीने महिलेवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी तो जोरजोरात आज तुझा जीवच घेणार असं ओरडत होता. महिलेच्या मानेवर, हातावर, खांद्यावर अनेक ठिकाणी कुऱ्हाडीचे वार करण्यात आले. जेव्हा महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या मृतदेहाला मिठी मारुन युवक बसला.

महिला होती विवाहित

मृत महिलेचं गावातील शांतीलाल याच्याशी लग्न झालं होतं. शांतीलाल कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहत होता. महिला तिच्या सासरी राहत होती. महिलेने अनेकदा गणेशबाबत तिचा पती शांतीलाल याला कळवलं होतं. त्यानंतर शांतीलालने गणेशला धमकी देत महिलेला त्रास देऊ नको असं बजावलं होतं. परंतु गणेश ऐकायला तयार नव्हता. त्याने महिलेचा पाठलाग करणं सोडलं नाही. महिलेवर प्रेम करुनही आपल्याला नकार देते हे कळताच गणेशला राग आला. त्याने काहीही विचार न करता महिलेवर कुऱ्हाडीने वार केले. महिलेच्या मृतदेहाला कवटाळून बसलेल्या आरोपी गणेशला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात सध्या पोलीस आणखी तपास करत आहेत.

Web Title: The brutal murder of a woman by youth out of one-sided love; hugged the corpse for many hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app