अनैतिक संबधाच्या संशयावरून चुलत भावाची निर्घुण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:59 PM2021-02-02T19:59:05+5:302021-02-02T19:59:11+5:30

Murder News चुलत भावाने भावावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घुण हत्त्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

Brutal murder of cousin brother on suspicion of immoral relationship | अनैतिक संबधाच्या संशयावरून चुलत भावाची निर्घुण हत्या

अनैतिक संबधाच्या संशयावरून चुलत भावाची निर्घुण हत्या

Next

अकोट: तालुक्यातील ग्राम सुकळी येथे अनैतिक संबधाच्या संशयावरून चुलत भावाने भावावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घुण हत्त्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून धारदार चाकू जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकळी गावातील गोपाल धनराज हरमकार(२७) याचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय त्याचा चुलत भावू दीपक शेषराव हरमकार याला होता. यातून त्यांच्या नेहमी वाद व्हायचे. अनैतिक संबधाच्या संशयातून आरोपी दीपक हरमकार याने मंगळवारी सकाळी गोपाल हरमकार याच्या पोटावर चाकूने सपासर वार केले. यात गोपाल गंभीर जखमी झाला. त्याला कुटूंबिय व ग्रामस्थांनी अकोट येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी घटनास्थळाला भेट दिली. गोपाल हरमकार याचा मृतदेह शवविच्छदनासाठी रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपी दीपक शेषराव हरमकार याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून धारदार चाकू जप्त केला. सुकळी गावातील अनैतिक संबंधाचे संशयावरुन घडलेले हे दुसरे हत्याकांड आहे. अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी दीपक हरमकार याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपी दीपक हरमकार याने अनैतिक संबधाच्या संशयावरून चुलत भावाची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

- ज्ञानोबा फड, ठाणेदार अकोट ग्रामीण

Web Title: Brutal murder of cousin brother on suspicion of immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.