सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:50 IST2025-08-23T20:47:13+5:302025-08-23T20:50:56+5:30

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उभ्या असलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या AC कोच B2 च्या टॉयलेटमधून एका ५ वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळून आला. २२ ऑगस्टला याच मुलाचे सुरतमधून अपहरण झाले होते.

Brought from Surat and murdered in Mumbai; Five-year-old boy found in train toilet killed by aunt's son | सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...

सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...

मुंबई - काल रात्री मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये पार्क केलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या AC कोच B2 च्या टॉयलेटमध्ये ५ वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळल्याने गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना ट्रेन साफ ​​करताना मृतदेह आढळला, त्यानंतर रेल्वे पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. आरपीएफ आणि जीआरपी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह बाहेर काढला, पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. या मृतदेहाबाबत एक मोठी अपडेट समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये २२ ऑगस्ट रोजी एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. याच बेपत्ता मुलाचा मृतदेह असल्याचे समोर आले. मुलाचे अपहरण त्याच्याच मावस भावाने केले होते, असा आरोप तक्रारीत केला होता. या आधारावर, अमरोली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर पाळत ठेवून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त

या संदर्भात, अमरोली पोलिसांचे पथक शुक्रवारी पहाटे ४ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचले. त्यांनी रेल्वे पोलिसांकडून मुलाची आणि आरोपीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की कुशीनगर एक्सप्रेसमधून एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर, मृतदेहाचा फोटो कुटुंबाला पाठवण्यात आला, कुटुंबाने हा मुलगा त्यांचात असल्याचे सांगितले.

सुरतमधून अपहरण ते मुंबईत हत्या.  आरोपी मुलाला घेऊन मुंबईत कसा पोहोचला आणि कोणत्या परिस्थितीत त्याची हत्या करण्यात आली याचा तपास आता पोलिस करत आहेत. सध्या आरोपीच्या शोधात अनेक पोलिस पथके आहेत. पीडितेचे कुटुंब मूळचे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील आहे, ते रोजगारासाठी गुजरातमधील सुरत येथे स्थायिक झाले होते. या खळबळजनक घटनेने केवळ स्थानिक पोलिसच नाही तर रेल्वे सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले आहे.

Web Title: Brought from Surat and murdered in Mumbai; Five-year-old boy found in train toilet killed by aunt's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.