पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:31 IST2022-01-08T17:31:10+5:302022-01-08T17:31:47+5:30
एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे

पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार
मीरारोड - एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे . मदत करायला गेला आणि मोबाईल गमावून बसला अशी पाळी तरुणावर आली आहे .
भाईंदर पोलीस ठाण्या मागील शास्त्री नगर मध्ये राहणारा करण कानु (२०) हा गुरुवारी सायंकाळी कामावरून घरी जेवणासाठी पायी चालला होता . त्यावेळी राजेश हॉटेल जवळ एका अनोळखी इसमाने त्याला हाक मारत टेम्पोतील सामान काढायचे असून बिगारी ओळखीचा आहे का विचारले . करण याने त्याच्या भागातील एका बिगारीला कॉल करून येण्यास सांगितले . दरम्यान त्या इसमाने एका नंबरवर कॉल लाव सांगितले असता करण याने कॉल लावून मोबाईल त्याला दिला . बोलता बोलता त्या इसमाने पाण्याची बाटली घेऊन ये सांगून ५० रुपये दिले असता करण पाणी आणण्यास गेला . बाटली घेऊन परतला असता तो इसम दिसला नाही . त्याचा शोध घेऊन देखील तो न सापडल्याने १५ हजारांचा मोबाईल पळवल्या प्रकरणी अनोळखी इसमा विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .