सख्ख्या भावांनीच बहिणीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे तुकडे करून जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 00:01 IST2020-07-23T23:58:57+5:302020-07-24T00:01:52+5:30

कोणाला कळू नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन जाळण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Brothers killed their sister and burnt her body into pieces in thane | सख्ख्या भावांनीच बहिणीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे तुकडे करून जाळले

सख्ख्या भावांनीच बहिणीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे तुकडे करून जाळले

ठळक मुद्दे1 मे रोजी रात्री प्रतिभाचे भाऊ नाथा अशोक पाटील (31), भगवान अशोक पाटील (24), बालाजी अशोक पाटील (20) आणि पांडुरंग अशोक पाटील यांनी एकमत करून तिला लोखंडी सळीने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही भावांना अटक केली तर एक भाऊ फरार आहे.

ठाणे - चार भावांनी मिळून बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण डायघर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भावांनी मिळून बहिणीला लोखंडी सळईने मारहाण करून हत्या केली. त्यानंतर कोणाला कळू नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन जाळण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही भावांना अटक केली तर एक भाऊ फरार आहे.

एप्रिल महिन्यात घरातून गेलेली प्रतिभा म्हात्रे 15 दिवसानंतर घरी परतली. तेव्हा तिच्या भावंडांनी तिला इतके दिवस कुठे होतीस, असा जाब विचारला. यावरून चार भावंडे आणि बहिणीत कडक्याचे भांडण झाले. त्यानंतर 1 मे रोजी रात्री प्रतिभाचे भाऊ नाथा अशोक पाटील (31), भगवान अशोक पाटील (24), बालाजी अशोक पाटील (20) आणि पांडुरंग अशोक पाटील यांनी एकमत करून तिला लोखंडी सळीने मारहाण केली. तसेच तिची ओढणीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी डायघर पोलिसांनी तिघा भावांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे.

ठाणे शहरात प्रतिभा म्हात्रे ही आपल्या आईवडील आणि चार भावांसोबत राहत होती. तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे ती माहेरी राहत होती. परंतु, उदरनिर्वाहासाठी ती एका बीअर बारमध्ये लेडिज वेटरचे काम करत होती. काही दिवसांनी भावांना आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात भांडणेही होत होती. अखेर 1 मे रोजी भावांनी मिळून तिचा खून केला. त्यानंतर कोणालाही कळू न देता तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन ते जाळून टाकले. याबाबत एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तपास केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी डायघर पोलिसांनी तीन भावांना अटक केली असून याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.

Web Title: Brothers killed their sister and burnt her body into pieces in thane