भाऊबीजच्या पहाटे थरार! रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटोव्हेटर पळविले 

By विजय.सैतवाल | Updated: November 15, 2023 10:13 IST2023-11-15T10:12:49+5:302023-11-15T10:13:10+5:30

भाऊबीजच्या पहाटे खुनाच्या घटनेने वावडदा परिसर हादरला आहे.

Brother's early morning thrill! The janitor was killed and the tractor and rotovator were taken away | भाऊबीजच्या पहाटे थरार! रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटोव्हेटर पळविले 

भाऊबीजच्या पहाटे थरार! रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटोव्हेटर पळविले 

जळगाव : रात्री शेतामध्ये रखवालदारीसाठी गेलेल्या पांडुरंग पंडित पाटील (५२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांचा अज्ञात चोरट्यांनी डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला. खुनानंतर शेतातील ट्रॅक्टर व रोटोव्हेटर घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी वावडदे ते म्हसावद दरम्यान असलेल्या शेतात मालक गेले त्यावेळी उघडकीस आली.

भाऊबीजच्या पहाटे खुनाच्या घटनेने वावडदा परिसर हादरला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदे ते म्हसावद दरम्यान ईश्वर मंसाराम पाटील (रा. बिलवाडी) यांचे शेत आहे.  तेथे पांडुरंग पंडित पाटील (५२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) हे  रखवालदार म्हणून काम करतात. १४ रोजी रात्री ते शेतात  रखवालीसाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तू टाकून खून केला. तसेच शेतातील ट्रॅक्टर व रोटोव्हेटर पळवून नेले. 

सकाळी शेतमालकांचा मुलगा शेतात गेला त्यावेळी ही घटना समोर आली. त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे स्वप्निल पाटील,  बिलवाडी येथील  पोलिस पाटील सुवर्णा उंबरे घटनास्थळी दाखल झाले. पळून नेलेले ट्रॅक्टर सकाळी  खडके फाटा, ता.एरंडोल येथे आढळून आले.

Web Title: Brother's early morning thrill! The janitor was killed and the tractor and rotovator were taken away