वाढदिवसाच्या दिवशी झाली भावाची हत्या; मित्रानेच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:42 IST2022-09-18T07:42:11+5:302022-09-18T07:42:23+5:30

वादावादीतून मित्रानेच केला खून

Brother was killed on birthday; The friend committed the murder | वाढदिवसाच्या दिवशी झाली भावाची हत्या; मित्रानेच केला खून

वाढदिवसाच्या दिवशी झाली भावाची हत्या; मित्रानेच केला खून

लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापुरातील सर्वांत वर्दळ असलेल्या कात्रज चौकात मित्रा-मित्रांमध्ये झालेल्या भांडणात शुभम मोरे याची हत्या झाली. बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्याची हत्या झाली आहे त्याच्या भावाचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवसाची पार्टी साजरी करूनच ते घरी परतत असताना हा प्रकार घडला.

शिवम मोरे याचा १५ सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी करून तो आणि त्याचा भाऊ शुभम कात्रज चौकात आले होते. त्याचवेळी शिवम याचा दुसरा मित्र विशाल आणि पुष्कर धुळे हे तेथे आले. यावेळी मित्रा-मित्रांमध्ये वादावादी झाली आणि  हाणामारी सुरू झाली. पुष्कर धुळे याने शिवम याला मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर शिवमचा मोठा भाऊ शुभम भांडण सोडवू लागला. त्यावेळी पुष्करने शुभमलाही मारहाण केली. त्यात पुष्कर याच्या हाताचा कोपरा शुभमच्या छातीला जोरदार लागल्याने शुभमचा मृत्यू झाला. शिवमच्या फिर्यादीवरून पुष्कर धुळे याच्यावj गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Brother was killed on birthday; The friend committed the murder