बहिणीच्या प्रियकरासह त्याच्या मित्रावर भावाने केला चाकू हल्ला; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:14 IST2023-08-16T17:14:23+5:302023-08-16T17:14:38+5:30

पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने आरोपींच्या तावडीतून तो प्रियकर आणि त्याचा मित्र सुदैवाने वाचला.

Brother stabs his friend with sister's boyfriend; Both were arrested, Navi Mumbai | बहिणीच्या प्रियकरासह त्याच्या मित्रावर भावाने केला चाकू हल्ला; दोघांना अटक

बहिणीच्या प्रियकरासह त्याच्या मित्रावर भावाने केला चाकू हल्ला; दोघांना अटक

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकासमोरील रघुलीला मॉलसमोरील रस्त्यावर रविवारी रात्री रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. यात बहिणीच्या भावाने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रावर एका सहकाऱ्याच्या मदतीने चाकूहल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने आरोपींच्या तावडीतून तो प्रियकर आणि त्याचा मित्र सुदैवाने वाचला.

हसन सिद्धिकी आणि युसूफ शहा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेले दोन चाकू आणि कार जप्त केली आहे. यातील तक्रार शुभम हाजीज सरवैया हा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र निजामोद्दीन खान सोबत रघुलीला मॉल परिसरात आले होते. त्यावेळी रात्री एका कारमधून आलेल्या हसन सिद्दिकी आणि युसूफ शहा यांनी अचानक निजामोद्दीन खान यास मारहाण करून त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या मदतीस आलेला दुसरा एक मित्र रघुराम पै हा आला असता त्याच्यावर त्यांनी वार केले. 

रस्त्यावरच सुरू असलेल्या रक्तरंजित थराराची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांना आरोपी जुमानत नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. तेव्हा कुठे ते शांत झाले. चौकशीत आरोपीच्या नात्यात असलेल्या एका मुलीचे निजामोद्दीनशी प्रेमसंबंध होते. त्याचा राग मनात धरून हल्ला हा केल्याचे आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. यात निजामोद्दीन हा गंभीर जखमी आहे. त्याच्यासह त्याचा मित्र रघुराम पै या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Brother stabs his friend with sister's boyfriend; Both were arrested, Navi Mumbai