वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असताना भावाची हत्या; बदलापूरील घटना

By पंकज पाटील | Updated: September 17, 2022 20:54 IST2022-09-17T20:54:26+5:302022-09-17T20:54:55+5:30

लहान भावाचं भांडण सोडवायला गेला अन्...

brother murdered while coming home from a birthday party in Badlapur | वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असताना भावाची हत्या; बदलापूरील घटना

वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असताना भावाची हत्या; बदलापूरील घटना

बदलापूर: बदलापुरातील सर्वात वर्दळ असलेला कात्रप चौकात मित्र मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाची हत्या झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्याची हत्या झाली आहे, त्याच्या भावाचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवसाची पार्टी साजरी करूनच ते घरी परतत असताना हा प्रकार घडला आहे.

फिर्यादी शिवम मोरे त्याचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी करून तो आणि त्याचा भाऊ शुभम हे दोघेही कात्रप चौकात आले होते. त्याच वेळी शिवम याचा दुसरा मित्र विशाल आणि पुष्कर धुळे हे दोघेदेखील त्या ठिकाणी आले. यावेळी आवाज देण्यावरून मित्रा मित्रांमध्ये वादावादी झाली आणि त्यातच हाणामारी सुरू झाली. पुष्कर धुळे याने शिवम याला मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर शिवमचा मोठा भाऊ शुभम मोरे हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला. यावेळी पुष्कर याने शुभम याला देखील मारहाण केली. या मारहाणीत पुष्कर याचा हाताचा कोपरा शुभम याच्या छातीला जोरदार बसल्याने शुभम याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिवम मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुष्कर धुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: brother murdered while coming home from a birthday party in Badlapur