दीर आणि त्याचा मित्र करायचे बलात्कार; महिलेनं केली पतीकडे तक्रार; मिळालं धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 01:09 PM2021-08-08T13:09:13+5:302021-08-08T13:09:37+5:30

पीडित महिलेकडून पोलीस तक्रार दाखल; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Brother in law his friend rape woman husband says it will continue if she doesnt get dowry | दीर आणि त्याचा मित्र करायचे बलात्कार; महिलेनं केली पतीकडे तक्रार; मिळालं धक्कादायक उत्तर

दीर आणि त्याचा मित्र करायचे बलात्कार; महिलेनं केली पतीकडे तक्रार; मिळालं धक्कादायक उत्तर

Next

बिजनोर: उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहितेवर तिच्या दिरानं आणि त्याच्या मित्रानं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यावर तू माहेरहून ५ लाख रुपये हुंडा आणि एसयूव्ही आणत नाही, तोपर्यंत हेच सुरू राहील, असं उत्तर पतीनं दिलं. 

पीडित महिला २७ वर्षांची असून तिनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर राजबपूर पोलीस ठाण्यात महिलेच्या सासरच्या १२ व्यक्तींविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 'तीन वर्षांपूर्वी माझा विवाह झाला. माझ्या पालकांनी खूप हुंडा दिला. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर माझ्या पतीनं आणि त्याच्या कुटुंबानं ५ लाख आणि आलिशान कारची मागणी केली. मी यासाठी नकार दिल्यावर त्यांनी छळ करण्यास सुरुवात केली,' अशा शब्दांत पीडितेनं तिची व्यथा मांडली.

'मी गर्भवती राहिल्यावर त्यांनी मला गर्भपात करायला लावला. त्यांनी मारहाण सुरुवात केली. त्यामुळे मी माहेरी निघून गेले. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा घरी बोलावून घेतलं. तिथे माझा दीर आणि त्याच्या मित्रानं माझ्यावर बलात्कार केला. मी पतीला याबद्दल सांगितलं. तो काहीच बोलला नाही. जोपर्यंत एसयूव्ही आणि पैसे आणत नाही, तोपर्यंत हेच सुरू राहील, असं त्यानं मला सांगितलं,' असं महिला म्हणाली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: Brother in law his friend rape woman husband says it will continue if she doesnt get dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.