दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:35 PM2021-12-06T15:35:42+5:302021-12-06T15:37:23+5:30

Suicide Case : तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे.

Brother in law and sister in law commit suicide by jumping in front of a train; they had run away from home 12 days ago | दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून

दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून

googlenewsNext

करनाल - हरियाणातील करनाल जिल्ह्यातील घोघारीपूर या गावातील रहिवाशी २७ वर्षीय अमन आणि ३४ वर्षीय परमजीत यांनी शान-ए-पंजाब ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही गेल्या १२ दिवसांपासून घरातून पळून गेले होते. सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना समजली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

घोघाडीपूर गावातील रहिवासी राय सिंह यांनी सांगितले की, अमन आणि परमजीत हे एकमेकांचे दीर आणि वहिनी आहे. परमजीतचा १२ वर्षांपूर्वी मनोजसोबत विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. अमनचे लग्न झालेले नाही. काही दिवसांपूर्वी अमन-परमजीत घरातून पळून गेले होते, त्यांना १५ दिवसांनी शोध घेऊन घरी आणण्यात आले.

परमजीत तिच्या मुलांसोबत राहत होती आणि अमनला गावातून हाकलून दिले. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघेही बेपत्ता झाले होते. कोणीतरी फोन करून सांगितले की, अमन रेल्वे रुळावर आढळून आला आहे, त्याच्यासोबत एक महिलाही आहे. घरच्यांनी शहनिशा केल्यानंतर ते दोघे अमन आणि परमजीत असल्याचं उघड झालं. दोघांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध होते.

त्याचवेळी गावातील आणखी एका रहिवाशाने सांगितले की, सकाळी अमन आणि परमजीतने आत्महत्या केल्याचे समजले. दोघेही गावातून पळून गेले होते. शवविच्छेदनानंतर तो मृतदेह घरी नेणार आहे. उपनिरीक्षक काश्मीर सिंह यांनी सांगितले की, सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे रुळावर मृतदेह असल्याची माहिती मिळाली.

तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे. आत्महत्येचे कारण काय याबाबत पोलीस तपास करतील. दोघांनीही शान-ए-पंजाब ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. सध्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे 174 ची कारवाई करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

Web Title: Brother in law and sister in law commit suicide by jumping in front of a train; they had run away from home 12 days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.