बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची भावाकडून हत्या; पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 22:49 IST2020-01-31T22:47:28+5:302020-01-31T22:49:06+5:30

विवाहित बहिणेची छेड काढणाऱ्या गुंडाची लहान भावानं चाकू भोसकून केली हत्या

brother kills criminal who molest his sister | बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची भावाकडून हत्या; पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची भावाकडून हत्या; पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

नागपूर: विवाहितेच्या घरात शिरून तिची छेड काढणाऱ्या गुंडाचा विवाहितेच्या भावानं खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली. गुंडाची हत्या केल्यानंतर विवाहितेच्या भावानं पोलीस ठाणं गाठून आत्मसमर्पण केलं. 

विवाहितेची छेड काढणारा गुंड रोशन चौरसिया परिसरातच फिरत होता. त्यावेळी गुरू घासीदास गुरुद्वाराच्या परिसरात त्याचा विवाहितेचा भाऊ राजा भारतीसोबत वाद झाला. रोशननं राजावर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये हाणामारी सुरू असताना राजानं रोशनच्या हातातला चाकू हिसकावला आणि त्याच्यावर वार केले. यामध्ये रोशनचा मृत्यू झाला.

बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची हत्या केल्यानंतर राजानं पळून न जाता थेट पोलीस ठाणं गाठलं. त्यानं कळमना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी राजाला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मिनीमाता नगर परिसरात घडलेल्या या घटनेची नागपुरात सध्या सर्वत्र चर्चा आहे. 
 

Web Title: brother kills criminal who molest his sister