बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, भावाने तरूणाला कुऱ्हाडीने कापून फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:40 IST2022-06-16T11:39:42+5:302022-06-16T11:40:09+5:30

Kanpur Crime News : कानपूरच्या चौबेपूर भागात बुधवारी सकाळी ताराचंदचा मृतदेह एका शेतात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली, तेव्हा समजलं की, तरूण महाराजपूरचा राहणारा आहे.

Brother killed youth to make video of girl taking bath in Kanpur | बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, भावाने तरूणाला कुऱ्हाडीने कापून फेकलं

बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, भावाने तरूणाला कुऱ्हाडीने कापून फेकलं

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur Crime News) हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला आंघोळ करणाऱ्या तरूणीचा व्हिडीओ काढण्याची किंमत आपली जीव देऊन चुकवावी लागली. तरूणीच्या भावाने आपल्या मित्रासोबत मिळून कुऱ्हाडीने तरूणाची हत्या केली. आरोपी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीच्या भावाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

कानपूरच्या चौबेपूर भागात बुधवारी सकाळी ताराचंदचा मृतदेह एका शेतात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली, तेव्हा समजलं की, तरूण महाराजपूरचा राहणारा आहे. एक दिवसाआधी तो चौबेपूरमध्ये राहणाऱ्या हर्षितसोबत दिसला होता. पोलिसांनी जेव्हा हर्षितची चौकशी केली तेव्हा त्याने सगळं सांगितलं. पोलिसांनी हत्येप्रकरणी त्याचा मित्र शोभित यालाही अटक केली.

हर्षितने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. ताराचंद माझ्या आत्याचा मुलगा होता, त्यामुळे त्यालाही बोलवलं. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ताराचंदने माझ्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला होता. त्याने मला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दारू पिण्यासाठी पैसे मागितले. बहिणीचा व्हिडीओ बघून मी संतापलो. मी आधी 200 रूपयांची कुऱ्हाड खरेदी केली आणि त्याला दारू पाजली. मंगळवारी हनुमान मंदिरात उत्सव होता. त्याला सोबत घेऊन गेलो आणि मित्र शोभितसोबत मिळून त्याला कापून फेकलं.

याप्रकरणी कानपूरचे एसपी तेज स्वरूप सिंह म्हणाले की, पोलिसांनी हत्येत सहभागी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हर्षितने रागाच्या भरात त्याची हत्या केली. छेडछाड प्रकरणाचीही चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: Brother killed youth to make video of girl taking bath in Kanpur