सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला लपवून; घरातील रोख रक्कम, दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:16 PM2022-07-24T19:16:34+5:302022-07-24T19:17:03+5:30

Murder Case : घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेले.

Brother killed his brother and kept the body hidden in the fridge; Cash and jewelery were looted from the house | सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला लपवून; घरातील रोख रक्कम, दागिने लुटले

सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला लपवून; घरातील रोख रक्कम, दागिने लुटले

Next

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 50 वर्षीय सख्ख्या भावाची दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्या करून मृतदेह घरात ठेवलेल्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक हा मृताचा सख्खा भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी दिल्लीतील सीलमपूर भागात घरात ठेवलेल्या फ्रीजमधून 50 वर्षीय झाकीरचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 55 वर्षीय आबिद हुसेन आणि मृत झाकीरचा भाऊ 25 वर्षीय जाहिद यांना अटक केली आहे.

चौकशीदरम्यान दोघांनी उघड केले आहे की, झाकीर घरात एकटाच राहत होता आणि झाकीरच्या घरात बरीच रोकड ठेवल्याची माहिती दोघांना मिळाली होती. रोकड लुटण्याच्या उद्देशाने दोघेही झाकीरच्या घरी गेले आणि जाकीरच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेले.

पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला


पोलिसांनी चार लाखांचा ऐवज, दागिने आणि हत्येत वापरलेला हातोडा जप्त केला आहे. मृत झाकीर हा घरात एकटाच राहत होता, तर झाकीरची पत्नी आणि मुले त्याच्यापासून फार पूर्वीपासून विभक्त झाली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Brother killed his brother and kept the body hidden in the fridge; Cash and jewelery were looted from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.