ब्रिटिश महिलेवर बलात्कार, भारतीय विद्यार्थ्याला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 06:38 IST2023-06-20T06:38:38+5:302023-06-20T06:38:48+5:30

४ जून, २०२२ रोजी एका नाइट क्लबमध्ये पीडित महिला आणि प्रीत यांची ओळख झाली.

British woman raped, Indian student jailed | ब्रिटिश महिलेवर बलात्कार, भारतीय विद्यार्थ्याला कारावास

ब्रिटिश महिलेवर बलात्कार, भारतीय विद्यार्थ्याला कारावास

लंडन : एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपात एका २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला सहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. प्रीत विकल असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
४ जून, २०२२ रोजी एका नाइट क्लबमध्ये पीडित महिला आणि प्रीत यांची ओळख झाली. क्लबमधून बाहेर पडताना पीडित महिला मद्यधुंद असल्याने तिला नीट चालतानाही येत नव्हते. त्यामुळे मदत करण्याच्या बहाण्याने प्रीतने तिला उचलून त्याच्या फ्लॅटवर नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. सकाळी उठल्यानंतर पीडितेला तिच्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर, तिने पोलिसांकडे झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली.

१ वर्ष चालला तपास
तपासात पीडित आणि आरोपींमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग झाल्याचे उघड झाले, तसेच दोघांचे एकत्र फोटोही पोलिसांच्या हाती लागले. वर्षभर तपास करून, सर्व पुरावे एकत्रित 
करण्यात आले.

Web Title: British woman raped, Indian student jailed