शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

ब्रिटीश महिला बलात्कार प्रकरण : तीन दिवसांच्या पाळतीनंतर आरोपी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:37 PM

सहा महिन्यापूर्वी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिला लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व नंतर मडगाव न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 - सुशांत कुंकळयेकरमडगाव - सहा महिन्यापूर्वी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिला लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व नंतर मडगाव न्यायालयातून फरार झालेल्या यल्लप्पा रामचंद्रनप्पा या आरोपीला मडगाव पोलिसांनी बंगळुरू शहरापासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या जिगानी या परिसरात सोमवारी रात्री मोठय़ा शिताफीने अटक केली. गोव्यातून पळून गेल्यावर मूळ तमिळनाडूच्या या आरोपीने बंगळुरुला आसरा घेतला होता व तिथे तो ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होता, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.सोमवारी रात्री तो जिगानी या भागात येणार याची माहिती मिळाल्यानंतर मडगावचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी पनरगट्टा (कर्नाटक) पोलिसांच्या सहाय्याने त्याचा पाठलाग केला. सदर आरोपी अ‍ॅक्टीव्हा स्कुटरने येत असल्याचे पाहिल्यावर गोवा पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आपल्याला पकडणार हे ठाऊक झाल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याला शिताफीने अटक केली.मागच्या वर्षी 20 डिसेंबरला या आरोपीने काणकोण रेल्वे स्थानकावरून पाळोळेला जात असलेल्या एका ब्रिटीश महिलेवर पहाटेच्यावेळी बलात्कार करुन तिला लुटले होते. मात्र त्यावेळी त्याचे छायाचित्र जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले होते. हा बलात्कार करुन तो ट्रेनने मडगावला येऊन उतरला असता, त्याने अंगावर घातलेले जॅकेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्रच्या आरोपीप्रमाणे असल्याने मडगाव रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली होती. गोव्यातील वास्तव्यात त्याने पेडणे व वास्को येथेही झालेल्या दोन चोऱ्यात त्याचा हात असल्याचे उघडकीस आले होते. 29 जून रोजी त्याला मडगावच्या न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता आपल्याला शौचाला जायला पाहिजे असे सांगून तो शौचालयात गेला. त्यानंतर त्याने आतून कडी घालून नंतर शौचालयाच्या व्हेंटिलेटरचे गज वाकवून तो पळून गेला होता.अधीक्षक गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यापुर्वी गोवा पोलीस त्याच्या कृष्णगिरी तामिळनाडू येथील घरात चौकशीसाठी गेले होते. त्यामुळे त्याचे घर पोलिसांना माहित होते. आरोपीचे घर बंगळूरुपासून 8 कि.मी. अंतरावर असून, गोव्यातून पळुन गेल्यानंतर तो आपल्या घरी न जाता त्याने बंगळूरुला आश्रय घेतला होता. मात्र तरी गोवा पोलिसांनी त्याच्या बायकोवर स्थानिक खबऱ्यामार्फत नजर ठेवली होती. यातूनच त्याची बायको आपल्या नवऱ्याला भेटायला बंगळुरुला जाते ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बंगळूरुला आपला मुक्काम हलविला होता. बंगळुरुला तो कोणत्या भागात रहातो याची माहिती मिळाल्यानंतर मागचे तीन दिवस मडगाव पोलीस बंगळुरुला ठाण मांडून होते. सोमवारी रात्री तो जिगानी या परिसरात येणार याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे साफळा लावून ठेवला त्यात आरोपी अडकला अशी माहिती गावस यांनी दिली.मडगाव पोलिसांनी केलेली ही कामगिरी धाडसी स्वरुपाची होती,अशी प्रतिक्रिया गावस यांनी व्यक्त करताना या पथकाची बक्षिसासाठी शिफारस केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा