सासरी निघालेल्या नवरीला गुंडानी अडवलं; ड्रायव्हरला मारहाण, कारच्या चाव्या घेऊन पळाले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:56 IST2024-02-15T13:55:21+5:302024-02-15T13:56:34+5:30

एका गावातून लग्नाची वरात आली होती. नवरीची पाठवणी करण्यासाठी बेरी गावातील पवन द्विवेदी यांची गाडी बुक करण्यात आली होती.

bride stop on road going to inlaws house miscreants beat car driver took away key groom shocked | सासरी निघालेल्या नवरीला गुंडानी अडवलं; ड्रायव्हरला मारहाण, कारच्या चाव्या घेऊन पळाले अन्...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काही गुंडानी भरदिवसा स्कूटीवरून नवविवाहित वधूच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी कारला ओव्हरटेक केलं. ड्रायव्हरला बेदम मारहाण केली आणि कारच्या चाव्या घेऊन पळ काढला. त्यामुळे वधू-वरांना दुसऱ्या गाडीतून जावं लागलं  पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.

13 फेब्रुवारी रोजी कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून लग्नाची वरात आली होती. नवरीची पाठवणी करण्यासाठी  बेरी गावातील पवन द्विवेदी यांची गाडी बुक करण्यात आली होती. पवनने स्वतः गाडी चालवली. वधूची पाठवणी केल्यानंतर पवन नवरा-नवरीसह आपल्या कारने गावी परत जात होता. त्यानंतर स्कूटरवरून आलेल्या तीन गुंडानी त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला.

पवनच्या म्हणण्यानुसार, तीन जण नवरीसोबत गैरवर्तन करत होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो कारसह वेगाने पुढे जाऊ लागला. याच दरम्यान, त्या तिघांनी कारला ओव्हरटेक करून एका कार्यालयाजवळ ती थांबवली आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवनच्या चेहऱ्यावर आणि पोटात अनेक वार करण्यात आले, त्यामुळे तो जखमी झाला. कारची चावी काढून घेऊन तिघे चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.

हल्लेखोरांनी केलेल्या या भीषण घटनेने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केल्याने वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वधू-वरांना दुसऱ्या गाडीत पाठवावे लागले. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर कोतवाली पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत
 

Web Title: bride stop on road going to inlaws house miscreants beat car driver took away key groom shocked