दुसऱ्याच तरूणासोबत लग्न करत होती तरूणी, तरूणाने मंडपात घुसून झाडली नवरीवर गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 09:43 IST2023-02-06T09:41:06+5:302023-02-06T09:43:03+5:30

Pakistan Crime News : रविवारी लग्न सुरू असताना एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. हा तरूण न बोलवता लग्नात घुसला होता. इथे नवरीच्या लग्नाचे रिवाज सुरू होते, तेव्हाच त्याने तिच्यावर गोळी झाडली.

Bride shot during wedding in Rawalpindi people caught attacker | दुसऱ्याच तरूणासोबत लग्न करत होती तरूणी, तरूणाने मंडपात घुसून झाडली नवरीवर गोळी

दुसऱ्याच तरूणासोबत लग्न करत होती तरूणी, तरूणाने मंडपात घुसून झाडली नवरीवर गोळी

Pakistan Crime News : लग्नातून नवरी ती तिच्या सासरी जात असते, पण पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात एका नवरीला मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ती गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली होती. रावळपिंडीमध्ये रविवारी लग्न सुरू असताना एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. हा तरूण न बोलवता लग्नात घुसला होता. इथे नवरीच्या लग्नाचे रिवाज सुरू होते, तेव्हाच त्याने तिच्यावर गोळी झाडली.

जियो टीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाहुण्यांनी या हल्ला करणाऱ्या तरूणाला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यादरम्यान जखमी नवरीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरूणाला लग्न होत असलेल्या तरूणीसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीच्या परिवाराने त्याला लग्नास नकार दिला होता. याच रागातून त्याने तरूणीवर गोळी झाडली.

दुसरीकडे पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या एका पार्कमध्ये दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत एका महिलेवर रेप केला. पोलिसांनी सांगितलं की, इस्लामाबादच्या एफ-9 परिसरात पीडित महिला आपल्या एका पुरूष मित्रासोबत पार्कमध्ये फिरत होती. तेव्हाच दोन व्यक्तींनी त्यांना थांबवलं आणि जबरदस्ती त्यांना झुडपात नेलं. पुरूष मित्राला महिलेपासून वेगळं करण्यात आलं. जेव्हा ती ओरडली तेव्हा तिला आणखी पाच-सहा जणांना घेऊन येऊ अशी धमकी दिली.

त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडून घेतलेल्या वस्तूही तिला परत दिल्या. महिलेला आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी 1 हजार रूपयेही दिले आणि तिथून फरार झाले. पीडित महिला रात्री 11 वाजतानंतर पोलिसांकडे गेली आणि तिने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. 

Web Title: Bride shot during wedding in Rawalpindi people caught attacker