1.25 लाख कॅश, 3 लाखांचे दागिने; 2 महिन्यांत दुसऱ्यांदा बॉयफ्रेंडसोबत पळून गेली 'लुटेरी दुल्हन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 18:24 IST2024-01-28T18:18:08+5:302024-01-28T18:24:18+5:30

एका वधूने लग्नानंतर दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा पळ काढला. पहिल्यांदा ती परत आली, पण दुसऱ्यांदा तिने 1.25 लाख रुपये रोख आणि 3 लाख रुपयांचे दागिने सोबत नेले.

bride ran away with cash and jewellery in rewari haryana looteri dulhan | 1.25 लाख कॅश, 3 लाखांचे दागिने; 2 महिन्यांत दुसऱ्यांदा बॉयफ्रेंडसोबत पळून गेली 'लुटेरी दुल्हन'

फोटो - आजतक

हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील कोसली येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वधूने लग्नानंतर दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा पळ काढला. पहिल्यांदा ती परत आली, पण दुसऱ्यांदा तिने 1.25 लाख रुपये रोख आणि 3 लाख रुपयांचे दागिने सोबत नेले. पतीने तिचा शोध घेतला असता ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवरून जाताना दिसली. पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलीस आता या नवरीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेवाडी जिल्ह्यातील कोसली पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी दीपक कुमार याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. दीपकने सांगितले की, त्याचं लग्न 28 नोव्हेंबर 2023 रोजी जवळच्या गावातील मोनिका (20) हिच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं, पण 10 दिवसांनंतर पत्नी मोनिका अचानक घरातून बेपत्ता झाली.

 पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नी मोनिकाचा अनेक दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. मात्र एकदिवस ती घरी परतली. त्यावेळी ती शादीपूर येथील दिलावर याच्यासोबत गेल्याचं उघड झालं. मात्र घरच्यांनी आणि गावातील लोकांनी समजावून सांगितल्यानंतर त्याने पत्नीला पुन्हा सासरच्या घरी आणलं. मात्र आता पुन्हा ती घरातून अचानक बेपत्ता झाली. तिने घरात ठेवलेली लाखो रुपयांची रोकड आणि दागिने सोबत नेले आहेत.

मोनिकाने 1 लाख 25 हजार रुपये आणि 3 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने नेल्याचं सांगण्यात येत आहे. पसार झाल्यानंतर दीपकने सर्व मार्गाने तिचा शोध घेतला. माहेरीही तिच्याविषयी माहिती गोळा करण्यात आली, मात्र ती तिच्या घरीही पोहोचलेली नाही. यानंतर गावातील काही घरांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोनिका तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवरून जाताना दिसत आहे. 
 

Web Title: bride ran away with cash and jewellery in rewari haryana looteri dulhan