लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरीने केली पतीची हत्या, कारण समजल्यावर पोलिसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 09:32 IST2023-06-08T09:32:33+5:302023-06-08T09:32:46+5:30

Crime News : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी काही रितीरिवाज केल्यावर अशोक गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

Bride killed husband after wedding of third day illicit relation police arrested Gaya Bihar | लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरीने केली पतीची हत्या, कारण समजल्यावर पोलिसही झाले हैराण

लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरीने केली पतीची हत्या, कारण समजल्यावर पोलिसही झाले हैराण

Crime News : बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला अटक केली आहे. लकडाही गावात राहणाऱ्या अशोक कुमारचं लग्न 29 मे रोजी रेवती कुमारीसोबत झालं होतं. अशोक 30 मे रोजी आपल्या नवरीला घरी घेऊन आला होता.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी काही रितीरिवाज केल्यावर अशोक गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. 

मृत अशोकचा भाऊ धर्मेंद्रने पोलिसांना सांगितलं की, एका मित्राचा फोन आल्यावर अशोक 31 मे रोजी सायंकाळी बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आला नाही. एक जून रोजी अशोकचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. धारदार हत्याराने त्याचा गळा कापण्यात आला होता. 

अशात पोलिसांनी यासंबंधी चौकशी सुरू केली. तेव्हा पोलिसांसमोर हत्येबाबत धक्कादायक खुलासा झाला. मृतकाची नवरी रेवती कुमारीचे तिच्या मावस बहिणीचा पती उपेंद्र यादवसोबत प्रेमसंबंध होते. याची खबर अशोकला लागली होती. अशात लग्नाच्या रितीरिवाजा दरम्यानच महिलेने पतीच्या हत्येचा प्लान केला. रेवतीला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा तिने सगळं काही सांगितलं.

आरोपी रेवतीने सांगितलं की, तिने तिच्या मावस बहिणीच्या पतीला पतीची हत्या करण्यास सांगितलं. कारण तिच्या पतीला तिच्या अनैतिक संबंधाबाबत समजलं होतं. दरम्यान 6 जून रोजी रेवतीच्या मावस बहिणीचा पती उपेंद्र यादव याचा मृतदेह सुद्धा आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमांच्या काही खूणा नव्हत्या. उपेंद्रची हत्या कुणी केली याचा पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: Bride killed husband after wedding of third day illicit relation police arrested Gaya Bihar