The bride is killed! acid poured into the bride's mouth as the dowry was brought low | नववधूची हत्या! हुंडा कमी आणला म्हणून नववधूच्या तोंडात चक्क अ‍ॅसिड ओतले
नववधूची हत्या! हुंडा कमी आणला म्हणून नववधूच्या तोंडात चक्क अ‍ॅसिड ओतले

ठळक मुद्दे यशोदा देवी असं त्या नववधूचे नाव आहे. सासरच्यांना दिलेला हुंडा कमी वाटल्याने त्यांनी तिला मारहाण आणि त्रास द्यायला सुरुवात केली. बहेडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हुंडाबळीचा गुन्हा असून सासरची मंडळी फरार झालेली आहेत. 

उत्तर प्रदेशउत्तर प्रदेशमधील बरेली एका 21 वर्षीय विवाहित तरुणीची हुंडा कमी दिला म्हणून सासरच्यांनी निघृण जबरदस्ती अ‍ॅसिड तोंडात ओतून हत्या केली आहे. यशोदा देवी असं त्या नववधूचे नाव आहे. या घटनेनंतर यशोदाच्या सासरची मंडळी फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहे.

यशोदाचा बरेलीतील बहेडी परिसरात राहणाऱ्या ओमकारसोबत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी विवाहबंधनात अडकली होती. तिच्या लग्नाच्यावेळी तिच्या माहेरच्यांनी तिला हुंडा दिला होता. मात्र, सासरच्यांना दिलेला हुंडा कमी वाटल्याने त्यांनी तिला मारहाण आणि त्रास द्यायला सुरुवात केली. माहेरहून अधिक हुंडा घेऊन ये असे यशोदाला सांगितले. बहिणीवर होणारे अत्याचार थांबावेत म्हणून यशोदाचा भाऊ मनीष याने आणखी वीस हजार रुपये दिले. मात्र, तरी देखील ओमकारसह सासरच्या मंडळीची हाव कमी न होता वाटत गेली. नंतर त्यांनी पुन्हा यशोदाला त्रास द्यायला सुरुवात केली.

सोमवारी यशोदाने भयभीत होऊन तिच्या वडिलांना फोन केला आणि घडत असलेली हकीकत सांगितली. तिचे सासरचे तिला मारहाण करून जबरदस्ती काहीतरी पाजत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर तिचे वडील व भाऊ तत्काळ बहेडी पोलीस ठाण्यात पोचले आणि ओमकारविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले तेव्हा यशोदा गंभीर अवस्थेत पडलेली होती आणि तिची जीभ व ओढ भाजलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बहेडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हुंडाबळीचा गुन्हा असून सासरची मंडळी फरार झालेली आहेत. 

Web Title: The bride is killed! acid poured into the bride's mouth as the dowry was brought low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.