धक्कादायक! मधुचंद्राच्या रात्रीच नवरदेवाने मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप, नवरी म्हणाली - नशेचं औषध देऊन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:25 IST2021-12-02T15:24:14+5:302021-12-02T15:25:39+5:30

Bride gangrape in Etawah : महिलेने आपल्या पतीसोबतच त्याच्या दोन अनोळखी मित्रांवरही गॅंगरेपचा आरोप लावला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचून महिलेचा जबाब नोंदवला.

UP : Bride gangrape by husband and his two friends in Etawah | धक्कादायक! मधुचंद्राच्या रात्रीच नवरदेवाने मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप, नवरी म्हणाली - नशेचं औषध देऊन...

धक्कादायक! मधुचंद्राच्या रात्रीच नवरदेवाने मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप, नवरी म्हणाली - नशेचं औषध देऊन...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) इटावा (Etawah)मध्ये नवरीने नवरदेव आणि त्याच्या दोन मित्रांवर गॅंगरेप (Gangrape on Bride) केल्यावर आरोप लावून खळबळ उडवली आहे. ही घटना इटावातील परोली रमायन गावातील आहे. पीडित नवरीलाला बुधवारी रात्री उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पीडितेच्या वडिलांनी नवरदेव आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गॅगरेपची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

महिलेने आपल्या पतीसोबतच त्याच्या दोन अनोळखी मित्रांवरही गॅंगरेपचा आरोप लावला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचून महिलेचा जबाब नोंदवला. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडिताची न्यायाची मागणी करत आहे. या महिलेचं २८ नोव्हेंबरला लग्न झालं होतं.

महिलेच्या आईने आरोप केला की, मुलीच्या पाठवणीच्या दिवशीच तिच्या जावयाने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मुलीला नशेचे पदार्थ देऊन गॅंगरेप केला. ज्यानंतर तिची स्थिती बिघडल्याने तिला शहरातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर त्यांना सांगितलं की, मुलीची तब्येत बिघडली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. महिलेचे आईवडील हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा महिलेच्या सासरचे लोक हॉस्पिटलमधून पळून गेले. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीसोबत रेप आणि मारहाण झाली आहे.

पोलीस अधिकारी ओमवीर सिंहने सांगितलं की, बुधवारी उशीरा पोलिसांना माहिती मिळाली की, एक नवविवाहित महिला हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यानंतर माहिती मिळाली की, तिच्यावर तिचा पती आणि त्याच्या दोन मित्रांनी काही नशेचे पदार्थ खायला देऊन गॅंगरेप केला. पोलिसांनी महिलेचा आणि तिच्या आई-वडिलांचं जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे.
 

Web Title: UP : Bride gangrape by husband and his two friends in Etawah