शिवसेनेच्या लाचखोर नगरसेवकाला एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:35 IST2019-05-14T16:33:16+5:302019-05-14T16:35:28+5:30
४७ वर्षीय तक्रारदार हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत

शिवसेनेच्या लाचखोर नगरसेवकाला एसीबीने केली अटक
कल्याण - १ लाखांची लाच मागणाऱ्या गोरख जंगलीराम जाधव (२६) या नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आज अटक केली आहे. ४७ वर्षीय तक्रारदार हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदार यांना कल्याण महानगर पालिकेकडून मे.क्लासिक कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे रस्ता आणि गटार बांधणीचे मिळालेल्या कामात कोणताही अडथळा न आणण्याकरीता तक्रारदार यांना मिळणाऱ्या एकूण रक्कमेच्या १० टक्केप्रमाणे १ लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणून १३ मी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी एसीबीने सापळा रचून शिवसेनेचा नगरसेवक गोरख जंगलीराम जाधवला अटक केली. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज सकाळी ११. ४४ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हा लाचखोर नगरसेवक हा कल्याण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ चा आहे.
कल्याण - १ लाखांची लाच मागणाऱ्या गोरख जंगलीराम जाधव (२६) या नगरसेवकाला एसीबीने केली अटक https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2019