लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:51 IST2019-03-08T18:50:15+5:302019-03-08T18:51:45+5:30
बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक
पालघर - पालघर जिल्हा परिषद कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) कृषी अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी 23 हजार रुपयांची मागणी केली होती.
आदिवासी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत शेतीसाठी विहिर खोदण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. मात्र, अशा सरकारी योजनांमधून शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या पैशांवर सरकारी अधिकाऱी डल्ला मारताना दिसतात. पालघरमध्ये एका शेतकऱ्याला विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी दौडा या अधिकाऱ्याने 23 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यानी कृषी अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. याआधी पालघरमध्ये दोन पोलीस उप निरिक्षकांना 3 लाखांची लाच घेताना पकडले होते. ही घटना ताजी असताना आणखी एका कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या लाचखोरांचं सत्र पालघरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.