Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:11 PM2021-10-26T18:11:33+5:302021-10-26T18:44:36+5:30

Aryan khan Bail : मुकुल रोहतगींनी आर्यनच्या जामिनासाठी जवळपास ५०-५५ मिनिटं युक्तिवाद केला. त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वपूर्ण संदर्भ देणाऱ्या निकालांचं वाचन केले.

Breaking: Hearing on Aryan Khan's bail application adjourned till tomorrow | Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

Next
ठळक मुद्देएका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचाने इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केले आहेत. हे सर्व प्रकरण एका राजकिय नेत्याच्या जावयाशी संबंधित आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबईउच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी हायकोर्टात भारताचे माजी ऍटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ मुकूल रोहतगी कोर्टात पोहचले आणि रोहतगी आर्यनच्या जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला. नंतर अरबाज मर्चंटची बाजू मांडण्यासाठी वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी कोर्टाने तुम्हाला किती वेळ लागेल, अशी विचारणा केली. त्यावर अमित देसाई यांनी ४५ मिनिटं लागतील तर एनसीबीच्या वतीने  एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी देखील ४५ मिनिटं लागतील असं सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. उद्या दुपारी यावर सुनावणी घेण्यात येईल. 

मुकुल रोहतगींनी आर्यनच्या जामिनासाठी जवळपास ५०-५५ मिनिटं युक्तिवाद केला. त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वपूर्ण संदर्भ देणाऱ्या निकालांचं वाचन केले.

ज्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत पकडलं जात नाही, त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागवणं चुकीचं आहे. NDPS कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं असा युक्तिवाद रोहतगी यांनी हायकोर्टात केला. जर कमी प्रमाणात अमली पदार्थ सापडले असतील तर त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं जात नाही. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. तर इथे आर्यनकडे काहीच सापडलेलं नाही आणि तरीही आर्यन २० दिवसांपासून तुरूंगात आहे असं रोहतगी यांनी हायकोर्टात म्हटलं. आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा, असा रोहतगी यांनी दावा केला. 

...तर त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं; आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांचा जोरदार युक्तिवाद

न्यायमूर्ती न्यायासनावरून उठले; आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीदरम्यान गोंधळ अन् गर्दी

आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सऍपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे. एनडीपीएस कायद्यात अमली पदार्थ्यांच्या मात्रेलाही महत्व आहे. आर्यनकडे तर काहीच सापडलेलं नाही. मग त्याच्यावर या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायद्यानं आरोपीकडे अमली पदार्थ सापडणं गरजेचं असतं, दुस-याकडे काय सापडलं त्याचा माझ्याशी काय संबंध? असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी केला. एका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचाने इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केले आहेत. हे सर्व प्रकरण एका राजकिय नेत्याच्या जावयाशी संबंधित आहे. मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, आमची केस गुणवत्तेच्याच आधारावर जामीनास पात्र असल्याचं रोहतगी हायकोर्टात म्हणाले.  

पुढे रोहतगी म्हणाले, आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यामुळे या घटनेतील आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल? असा सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला. आर्यननचा या हस्तगत केलेल्या अमली पदार्थांशी काहीही संबंध नसून त्याचा याच्या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत. त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत.

 

Web Title: Breaking: Hearing on Aryan Khan's bail application adjourned till tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.