शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्याने ऑनलाइन मागवले Apple Watch 6, पार्सलमधून आला दगड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:51 IST

Brazilian actor orders Apple Watch 6 online, gets stone instead : रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा अभिनेत्याने पार्सल उघडले, तेव्हा अॅपल वॉच ऐवजी एक दगड पाहून त्याला धक्काच बसला.

ऑनलाइन वस्तू मागवताना साबण, दगड मिळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. ग्राहक ई-कॉमर्स साइटवरून आयफोन ऑर्डर करतात आणि त्या बदल्यात त्यांना साबण किंवा काहीतरी मिळते. हे फक्त भारतातच घडते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

आता याबाबत ब्राझीलमधून एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगितले  आहे की, ब्राझीलच्या एका अभिनेत्यासोबतही अशीच घटना घडली आहे. ब्राझिलियन अभिनेत्याने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून Apple Watch 6 ऑर्डर केले, परंतु ते मिळाले नाही. त्याऐवजी, त्याला एक दगड मिळाला.

MacMagazine मधील एका रिपोर्टनुसार, ब्राझिलियन ब्लॉगर Lo Bianco यांनी सांगितले की, प्रसिद्ध अभिनेता  Murilo Benício ने किरकोळ विक्रेता Carrefour कडून 4 44mm Apple Watch Series 6 ऑर्डर केली. 12 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांची ऑर्डर मिळाली.

इतके दिवस वाट बघूनही अभिनेत्याला  Apple Watch मिळाले नाही.  Murilo Benício ला ऑनलाइन आलेल्या पार्सलमध्ये एक दगड मिळाला. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, अभिनेत्याने Apple Watch 6 साठी सुमारे 530 डॉलर दिले होते. म्हणजेच जवळपास 40,000 रुपये आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा अभिनेत्याने पार्सल उघडले, तेव्हा अॅपल वॉच ऐवजी एक दगड पाहून त्याला धक्काच बसला. याबद्दल अभिनेत्याने कंपनीशी संपर्क साधला, तेव्हा Carrefour ने त्याला मदत करण्यास नकार दिला.

9To5Mac च्या रिपोर्टनुसार, यानंतर अभिनेत्याने कंपनीवर दावा दाखल केला. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, अभिनेत्याने पुन्हा कंपनीसोबत डील केली  आणि Carrefour ने त्याला जवळपास 1500 डॉलर देण्याचे मान्य केले.  Apple Watch 6 गेल्या वर्षी लॉन्च झाले होते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBrazilब्राझील