सेक्ससाठी नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर फेकले अॅसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 16:08 IST2019-05-18T16:07:22+5:302019-05-18T16:08:52+5:30

आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Boyfriend thown acid on girlfriend due to refusing sex | सेक्ससाठी नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर फेकले अॅसिड

सेक्ससाठी नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर फेकले अॅसिड

ठळक मुद्देनसीमउल्लाने  (५०) प्रेयसीच्या (४५) अंगावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अॅसिड हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या कमरेखालचा भाग भाजला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर येथे सेक्सला नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकर असलेल्या नसीमउल्लाने  (५०) प्रेयसीच्या (४५) अंगावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अॅसिड हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून प्रियकराविरोधात तिलहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचे गेल्या पाच वर्षांपासून आरोपी नसीमउल्लासोबत अनैतिक संबंध होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर आरोपीने महिलेकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. पण, तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्या अंगावर अॅसिड फेकले. यात तिच्या कमरेखालचा भाग भाजला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यानंतर आरोपीने तिला तिथेच टाकून पळ काढला. महिलेने मदतीसाठी आरडोओरडा केल्याने शेजाऱी धावत आले आणि त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Boyfriend thown acid on girlfriend due to refusing sex