वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:42 IST2019-10-07T13:41:01+5:302019-10-07T13:42:46+5:30

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येते.

A boyfriend killed girlfriend in vakola was arrested from Sewree | वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक 

वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक 

ठळक मुद्दे या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.विनोद मूळ तामिळनाडूचा असून तो महिन्यातून एकदा संध्याला भेटायला शिवडीला येत असे.

मुंबई - वाकोल्यातील एका लॉजमध्ये प्रेयसीचा रस्सीने गळा आवळून हत्या केली. नंतर मुंबई सोडण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अर्ध्या तासाच्या आधीच अटक केली. चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येते. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शनिवारी दुपारी वाकोला येथील एका लॉजमध्ये संध्या हरिजन (23) या तरुणीची रस्सीने गळा दाबून हत्या झाली होती. या प्रकरणी रात्री नऊच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सर्व पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. संध्या शिवडीची राहणारी असल्याने शिवडी पोलीस देखील या हत्येचा समांतर तपास करत होते. संध्याची माहिती काढली असता तिचे विनोदकुमार हरिजन (28) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे चौधरी व त्यांच्या पथकाने विनोदचा शोध सुरू केल्यावर तो तामिळनाडूला जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानेच संध्याची हत्या केल्याची कबुल केले. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात शिवडी पोलिसांनी संध्याची हत्या करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकल्या. विनोद मूळ तामिळनाडूचा असून तो महिन्यातून एकदा संध्याला भेटायला शिवडीला येत असे. तो संध्याच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा. 

Web Title: A boyfriend killed girlfriend in vakola was arrested from Sewree