मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 16:01 IST2024-06-17T16:00:56+5:302024-06-17T16:01:58+5:30

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रेमी युगलाचा मृत्यू, मुलाच्या नातेवाईकांचा ऑनर किलिंगचा आरोप, पोलिसांचा तपास सुरू

Boyfriend commits suicide by shooting his girlfriend in Meerut, Uttar Pradesh | मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

मेरठ - एका प्रेमी युगलाच्या रहस्यमय मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केली त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असं सांगण्यात येत आहे. या दोन्ही जोडप्याचा मृतदेह प्रेयसीच्या घरात सापडला त्यामुळे प्रियकराच्या नातेवाईकांनी ही ऑनर किलिंग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलनं तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील अमरपूर गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी मनिष आणि त्याच्या शेजारील घरात राहणाऱ्या विधी यात गेल्या ३ वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. परंतु अलीकडेच मनिषचं लग्न ठरलं होतं. विधीला घेऊन पळून जाण्याचा मनिषचा इरादा होता परंतु विधीनं त्याला नकार दिला. रविवारी रात्री मनिष विधीच्या घरी पोहचला त्याठिकाणी दोघं किचनमध्ये बोलत होते. विधी पळून जाण्यास तयार नसल्याने मनिषचा राग अनावर झाला, त्यानंतर त्याने विधीच्या कानशि‍लात लगावली आणि बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली. यात विधीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या आवाजाने आसपासची मंडळी जमली तितक्यात मनिषनेही स्वत:वर गोळी झाडली. या दोघांचा मृतदेह किचनमध्ये सापडला.

तसेच या गोंधळात स्थानिकांनी पोलिसांना कळवलं, त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमोर्टमला पाठवले. मात्र यात प्रियकराच्या घरच्यांनी वेगळाच दावा केला आहे. मनिषला फोन करून मुलीच्या घरी बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या केली असं सांगत मनिषच्या नातेवाईकांनी विधीच्या कुटुंबावर ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला आहे. आता पोलीस या घटनेचा विविध अँगलने तपास करत आहेत. पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतरच या दोघांच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, मनिष हा मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. त्याचे १५ जुलैलला लग्न होणार होते. मात्र कुटुंबाने ठरवलेल्या मुलीसोबत लग्न करण्यास मनिष तयार नव्हता. त्यातून त्याने प्रेयसीसोबत पळून जाण्याचा प्लॅन बनवला. रात्री तो चेहऱ्यावर मास्क लावून प्रेयसीच्या घरी पोहचला. हे दोघे किचनमध्ये बोलत होते, तेव्हा मुलीची बहीण उठली तिने या दोघांना किचनमध्ये बोलताना पाहिले होते. रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. 

Web Title: Boyfriend commits suicide by shooting his girlfriend in Meerut, Uttar Pradesh