डिश अँटेना व्यवस्थित करण्यासाठी गेलेल्या मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 20:34 IST2019-01-01T20:32:49+5:302019-01-01T20:34:36+5:30
भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता.

डिश अँटेना व्यवस्थित करण्यासाठी गेलेल्या मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू
मीरारोड - टीव्ही नीट दिसत नाही म्हणून गच्चीवर डिश अँटेना दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय मुलाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.
भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता. आज मंगळवारी सकाळी घरातील टीव्ही दिसण्यास व्यत्यय येत असल्याने तो गच्चीवर असलेली डिश अँटेना व वायर व्यवस्थित आहे की नाही पाहण्यासाठी गच्चीवर गेला. गच्चीवर असलेल्या पत्र्यावर तो चढला असता पत्रा तुटला व तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.