घरात पती-पत्नी सारखं राहत होते चुलत भाऊ-बहीण; सत्य समोर आलं अन् घडला खतरनाक खूनी खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 19:21 IST2023-03-30T19:21:17+5:302023-03-30T19:21:35+5:30
त्या दोघांनी एका मंदिरात लग्न केले आणि घरात गुपचूप पती-पत्नीप्रमाणे राहत होते...!

घरात पती-पत्नी सारखं राहत होते चुलत भाऊ-बहीण; सत्य समोर आलं अन् घडला खतरनाक खूनी खेळ!
बिहारमधील समस्तीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चुलत बहिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलाने काकूचाच खून केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मोहिउद्दीननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोमवारी रात्री उशिरा घढली.
तीन वर्षांपासून सुरू होते प्रेम प्रकरण -
घठनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुरावे गोळा केले आणि संशयाच्या आधारे मुलाला अटक केली. यानंतर, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याचे आणि त्याच्या काकूच्या मुलीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही मोबाईलवर बोलत होते आणि चॅटही करत होते. एवढेच नाही, तर दोघांनी एका मंदिरात लग्न केले आणि गुपचूप पती-पत्नीप्रमाणे घरात राहत होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.
दोघांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न -
साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी त्याच्या काकूला यासंदर्भात भनक लागली होती. यानंतर त्यांनी मुलीला त्यांच्या बहिणीकडे पाठवले होते. मावशीच्या घरून परतल्यानंतर मुलगी आणि मुलाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. यातच, काकू आपल्या मुलीला बाहेर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे मुलाला समजले. यानंतर त्याने सोमवारी रात्री उशिरा वरव्हंट्याने वार करून काकूची हत्या केली आणि आपल्या रूममध्ये झोपायला गेला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. यावर, आरोपीने चुलत बहिणीच्या प्रेमातून काकूची हत्या केल्याचे एसपी विनय तिवारी यांनी म्हटले आहे.