शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅकमेल’ करुन मुलीला त्रास देणाऱ्या मुलास अटक; लातुरात गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: November 18, 2025 20:51 IST

पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत.

- राजकुमार जाेंधळे

लातूर : ब्लॅकमेल करुन मुलीला त्रास देणाऱ्या एका मुलाला दामिनी पथकाने ताब्यात घेत अटक केली असून, ही घटना लातुरात मंगळवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता दामीनी पथक गस्तीवर हाेते. त्यांना एका नागरीकाने फोन करून सांगितले, एक महाविद्यालयीन मुलगी रडत असून, एक मुलगा तिला चाकूने हात कापून घेताे आणि तुझे नाव घेतो असे म्हणत त्या मुलाने मुलीस एका हॉटेलमध्ये नेल्याची माहीती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत ८ मिनिटांत दामीनी पथकाने धाव घेतली. घटनास्थळावरुन पिडीत मुलगी आणि आरोपी मुलाला ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात हजर केले.

पिडीत मुलीकडे याबाबत अधिक चाैकशी केली असता तिने सांगितले की, विशाल वाळासाहेब केकान (रा. केकानबाडी, ता. केज, जि. बीड) हा पिडीतेला व्हॉटसअप आणि फोनद्वारे कॉल, मॅसेज करून त्रास देत असून, आजही त्याने जीव देतो असे म्हणून ब्लॅकमेल केले. अंबाजोगाई रोडवर बोलावून घेत माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत चल नाही तर मी हात कापून तुझे नाव घेतो. असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली. याबाबत पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहराचे डीवायएसपी समीरसिंह साळवे, शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अभिषेक शिंदे, दामीनी पथकातील अंमलदार प्रशांत नागरगोजे, भाग्यश्री झोडपे, पल्लवी चिलगर यांनी केली आहे.

पथकाला काॅल करा; मदतीला येतील पाेलिस...रस्त्यावर थांबलेल्या एका वाटसरूने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत दामिनी पथकाला कॉल करून माहीती दिल्याने पुढील अनर्थ टळला आहे. लातुरात रोडरोमीयो आणि टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास नागरीकांना, मुली-महिलांनी दामीनी पथकाला (मोबाईल क्रमांक ८८३०१ १५४०९) संपर्क करावा. तक्रार देण्याऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Boy Arrested for Blackmailing and Harassing Girl

Web Summary : A boy was arrested in Latur for blackmailing and harassing a girl. He threatened her, demanding she be with him or he'd harm himself and blame her. Police intervened after a concerned citizen alerted them.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी