बियरच्या बाटलीने चिरला गळा, ग्राहकांच्या भांडणात हॉटेल मालकाचा गेला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:36 PM2020-06-12T20:36:39+5:302020-06-12T20:38:47+5:30

जळगावातील घटना, दोन तासातच संशयित शरण

A bottle of beer slit his throat, the hotel owner dead in a customer quarrel | बियरच्या बाटलीने चिरला गळा, ग्राहकांच्या भांडणात हॉटेल मालकाचा गेला जीव 

बियरच्या बाटलीने चिरला गळा, ग्राहकांच्या भांडणात हॉटेल मालकाचा गेला जीव 

Next
ठळक मुद्दे याप्रकरणी शनी पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर हल्लेखोर प्रशांत भिवराज कोळी (रा.तानाजी मालुसरे नगर, जळगाव) हा दोन तासांनी पोलिसांना शरण आला.प्रशांत कोळी याने जेवायला बसलेल्या पंकज व दीपक यांच्याजवळ बियरच्या बाटल्या फोडल्या.

जळगाव - हॉटेलमधील ग्राहकांशी होत असलेला वाद सोडवायला गेलेले हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (४५, रा.असोदा, ता.जळगाव) यांचा बियरच्या बाटल्याने गळ्यावर वार करुन खून केला तर दीपक दिलीप जगताप (३०, रा.अयोध्या नगर, जळगाव) व पंकज सुनील वडनेरे (३०, रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता नेरी नाका स्मशानभूमीला लागून असलेल्या असोदा मटण हॉटेलमध्ये घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर प्रशांत भिवराज कोळी (रा.तानाजी मालुसरे नगर, जळगाव) हा दोन तासांनी पोलिसांना शरण आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत भिवराज कोळी व त्याचा साथीदार महेंद्र अशोक चौधरी हे दोघं शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून नेरी नाका स्मशानभूमीनजीक असलेल्या उमेश बियर अ‍ॅण्ड वाईन शॉपवर बाजूला बसून बियर प्राशन करीत होते. दुकान बंद करीत असताना प्रशांत याने मालकाकडे मोफत बियर मागितली असता तेथील एका कर्मचाऱ्याने दुकान बंद होण्याची वेळ झाल्याचे सांगून मोफत बियर देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी कर्मचाऱ्याशी वाद झाला. हा प्रकार शेजारीच असोदा मटन हॉटेलजवळ जेवायला बसलेले दीपक दिलीप जगताप व पंकज सुनील वडनेरे दोघं बघत असताना प्रशांत कोळी याने ‘तु माझ्याकडे काय पाहतो रे’ असे म्हणत पंकज व दीपक यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यावेळेत बियर शॉपचे मालक उमाकांत कोल्हे यांनी दुकान बंद करुन पळ काढला.

बाटली फोडली अन् मालकाच्या गळ्यावर केले वार
प्रशांत कोळी याने जेवायला बसलेल्या पंकज व दीपक यांच्याजवळ बियरच्या बाटल्या फोडल्या. एकाच्या मानेवर तर दुसऱ्याच्या पोटावर मारले. नेमका काय वाद होत आहे हे पाहण्यासाठी मालक प्रदीप चिरमाडे हॉटेलमधून बाहेर धावत आले असता प्रशांत याने त्यांच्या गळ्यावरच फुटलेल्या बियरच्या बाटलीने सपासप वार केले. चिरमाडे यांना तातडीने खासगी दवाखान्यात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. चिरमाडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गिरीश, मुलगी दिशा व भाऊ भानुदास असा परिवार आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

Web Title: A bottle of beer slit his throat, the hotel owner dead in a customer quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.