विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:47 IST2019-05-20T19:46:11+5:302019-05-20T19:47:05+5:30

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

Both of them were beaten with iron rods after the purchase auto rickshaw issues | विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण 

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण 

पिंपरी : विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन रिक्षा विकत घेणारया तरुणाला व त्याच्या भावाला चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 
    आलीशान अनिस शेख (वय २२, रा. त्रिवेणीनगरम चौक, तळवडे) याला अटक केली असून अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजीराव रामराव सरांडे (वय २१, रा. बागडे वस्ती, कुरळी फाटा, ता. खेड. जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी बाजीराव सरांडे यांचा भाऊ विकी याने आरोपी आलीशान याच्याकडून रिक्षा विकत घेतली होती. त्यावरुन आरोपीने बाजीराव सरांडे व त्यांचे भाऊ विकी यांना बोलावून घेतले. तसेच ह्यतु रिक्षा का घेवून गेलास असे म्हणत आरोपींनी बाजीराव व विकी यांना शिवीगाळ करत हातावर, पायावर, पाठीवर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यासह जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Both of them were beaten with iron rods after the purchase auto rickshaw issues