पिंपरी : महिलेचा पाठलाग करुन अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विवेकानंद सिकंदर ठाकूर (वय २७), बबलू उर्फ झहिअली करीम सय्यद (वय ३४, दोघेही रा. गंधर्वनगरी, मोशी, मूळ- बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे असून घुगे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला त्यांच्या मुलास शाळेच्या बसथांब्यावर सोडून घरी परतत असताना विवेकानंद व बबलू यांनी महिलेचा पाठलाग करीत अश्लील शेरेबाजी केली. व घुगे याने हा प्रकार पाहून त्याचा गैरफायदा घेत महिलेशी अश्लील वर्तन करुन बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महिलेला अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 16:40 IST