शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बोर्डी : आठ वर्षीय आदिवासी मुलीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:13 AM

कोयत्याने वार : आरोपीला अटक

ठळक मुद्देकोयत्याने वार : आरोपीला अटक

बोर्डी : रानशेत ग्रामपंचायतीच्या वांगडपाडा येथील वर्षा सुरेश घोषे (वय ८) हिची सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरानजीक प्रफुल्ल ऊर्फ प्रमोद घोषे (वय ४७) यांनी कोयत्याने वार करून हत्या केली. डहाणू पोलिसांनी आरोपीला मंगळवारी सकाळी जंगलातून अटक केली. त्याच्यावर कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रानशेत ग्रामपंचायतीच्या वांगडपाडा या आदिवासी पाड्यावर वर्षा घोषे राहत होती. येथील पाण्याच्या टाकीजवळ याच पाड्यावर राहणाऱ्या आरोपीने सोमवारी दुपारी कोयत्याने तिच्या तोंड, गळा, पाठ व दोन्ही हातावर वार केले. स्थानिक रहिवासी विलास बारक्या बोलाडा (वय ४०) यांनी जाब विचारताच त्यालाही जखमी करून आरोपी जंगलात पळाला. या जीवघेण्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. डहाणू पोलिसात फिर्याद नोंदविल्यानंतर जंगलात रात्रभर शोधमोहिम राबवून मंगळवारी सकाळी आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ हत्या आणि ३०७ हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. 

अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनाजी नलवडे यांनी मंगळवारी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.  दरम्यान, राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागात महिला अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आदिवासी पाड्यावरच्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या या हिंसक हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र